कृषीवलच्या दणक्याने नगरपरिषदने उदयान नाव हटविले

। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड नगरपरिषदेच्या समुद्रकिनारी असलेल्या नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या विश्राम बागेच्या नावामध्ये अपभ्रंश उद्यान ऐवजी उदयान लिहिल्याने शहरात सर्वत्र चर्चेचा विषय हि बातमी दैनिक कृषीवल मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उदयान नाव नगरपरिषदने हटविले आहे.

विश्राम बाग नाव असताना नगरपरिषदेच्या या नावापुढे उद्यान लिहण्याची गरज नसताना पेंटरने उदयान लिहिल्याने मुरुड शहरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. सोशल मीडिया वर फोटो टाकून हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. याची दखल आमच्या प्रतिनिधीने घेत सदरचे वृत्त दैनिक कृषीवल मध्ये प्रसिद्ध झाले असता नगरपरिषदेने त्वरित उदयान नाव हटविले आहे.

Exit mobile version