‌‘त्या’ वृद्ध महिलेची हत्याच

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पोलिसांचा संशय; अज्ञाताविरोधात गुन्हा

| उरण | प्रतिनिधी |

मोठे भोम गावातील घरात 9 नोव्हेंबरला मृतावस्थेत आढळून आलेल्या 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

नातेवाईकांपैकीच कुणीतरी हिराबाई यांची हत्या केल्याचा संशय असून, नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये शरीरावर टणक वस्तूने बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे आढळले. हिराबाई यांचे डोके, हाताचा पंजा, छाती व शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होत्या. तुटलेल्या, रक्ताने माखलेल्या दोन लाकडी पट्ट्याही घटनास्थळी आढळल्या. हिराबाईंनी जमीन विकली होती. त्यातील 15 लाखांची रक्कम त्यांच्या खात्यात आली होती. त्यातील पाच ते सहा लाख रुपये त्यांनी आपल्या नातेवाईकांना वाटले होते. याच वादातून त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Exit mobile version