पतीसह प्रेयसीला ठोकल्या बेड्या
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियंका रावत या 29 वर्षीय महिलेच्या खुनाचा प्रकरणाचा छडा लावण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही हत्या प्रियंकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियंकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. या हत्या प्रकरणातील मारेकरी व त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियंका रावत ही ठाणे येथून लोकलने पनवेल रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकर्याने गर्दीमध्ये प्रियंकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या करून पलायन केले होते. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी देवव्रतसिंग व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी ज्या मारेकर्यांच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणली. त्या दोन मारेकर्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.