पर्यटकांना खुणावतोय मुरुडचा निसर्ग

| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
कालपासून मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. परिणामी निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेल्या निसर्गरम्य गारंबी- सवतकडा- अंबोली धबधबा व फणसाड .त्याबरोबर छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.

कोरोनाच्या महामारीमुळे सवतकडा धबधब्याकडे पर्यटकांनी दोन वर्षे पाठ फिरवली होती. पण यावेळी पर्यटकांची पाऊले पुन्हा धबधब्यांकडे पडण्याची आशा निर्माण झालेली आहे.

निसर्गाचे जणू वरदानच
मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार पर्वतरांगा त्यावर निसर्गाने पांघरलेली दाट धुक्याची पसरलेली चादर, उंच कड्याकपारीतून खोल दरीत कोसळणारे धबधब, हिरव्यागार पर्वतरांगेतून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता, अंगाला झोंबणारा गारवारा. त्यातूननच अधुनमधून येणार्‍या पावसाच्या सरी. या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सवतकडा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धबधबा असून या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने पर्यटकांना अतिशय काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा लागतो.या ठिकाणी पर्यटकांना उभे राहण्यासाठी पिकनिक पॉइंट नसल्याने पर्यटकांची नाराजी दिसून येत.या ठिकाणी पिकनिक पॉईंट विकसित करणे गरजेचे आहे. आणि महत्वाचे आहे.कारण पावसाळी पर्यटनाला या धबधब्याना खुपचं महत्व आहे.

Exit mobile version