हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

। नेरळ । वार्ताहर ।
महाराष्ट्र दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शन यांचबरोबर शासनाच्या योजनांचा थेट लाभ देखील देण्यात आला.कर्जत पंचायत समिती आणि मानिवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी हुतात्मा हिराजी पाटील यांचे जन्मगाव असलेल्या मानिवली गावात पोहचले होते. सुरुवातीला महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर हुतात्मा स्मारक पर्यंत शैक्षणिक ग्रंथ दिंडी काढण्यात आली,त्या दिंडीमध्ये शिक्षक,ग्रामस्थ,विद्यार्थी आणि तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.या दिंदीची शोभा जिल्हा परिषद शाळा हेदवली येथील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने तसेच किरवली जिल्हा परिषद शाळेच्या नृत्य पथकाने सहभाग घेतला होता.दिंडी हुतात्मा स्मारकात पोहचल्यानंतर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळयाला अभिवादन हुतात्म्यांचे नातेवाईक वामन पाटील,तरे आणि अनसूया जामघरे यांनी केले. शासनाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स हुतात्मा स्मारक प्रांगणात लावण्यात आले होते.त्यात शिक्षण विभाग,कृषी विभाग,आरोग्य विभाग,पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, कोविड लसीकरण जागृती, विविध प्रकारचे कर्ज आदी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी, कोविड लसीकरण, सीएस्सी केंद्र यांचा समावेश होता. या सर्व स्टॉलला मान्यवरांनी व ग्रामस्थांनी भेट देऊन विविध शासकीय योजनांची माहिती घेतली आणि लाभ घेतला.उपक्रमशील शिक्षिका नेरळ कन्या शाळेच्या लोकोश्री चित्ते यांच्या वाचन मित्र या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महेश खाडे यांनी केले. त्यावेळी मानिवली ग्रामपंचायतचे तुषार गवळी,रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मंडलिक,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम साबळे, सहायक गटविकास अधिकारी सी एस रजपूत,गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे,तसेच शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version