| प्रमोद जाधव | स्व. गणपतराव देशमुख नगरी, पंढरपूर |
सत्यशोधक विचारसरणीचा पाया कार्यकर्त्यांनी विसरता कामा नये. शेतकरी कामगार पक्षाची निर्मिती या चळवळीतूनच झाली आहे. सत्ता मिळवण्यासाठी देशात सध्या राजकीय परिस्थिती अतिशय भयावह आहे. धर्म, जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. संत तुकारामांची हत्या करून ते वैकुंठास गेल्याचे भासवून दिले. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे आरएसएस प्रणित हे सरकार आहे. खोटे बोलून, दिखावा करून भावना दुखवून राज्य निर्माण करण्याचे काम हे सरकार करीत आहे. भावनांचा आधार घेऊन ही मंडळी सत्तेत बसली. नाटक करणार्या या सरकारविरोधात लढण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. शेतकरी कामगार पक्षाची शक्ती निर्माण करून यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.