| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेकडे असलेल्या नेरळ स्थानकाच्या पुढील रेल्वे क्रॉसिंग फाटक दुरुस्तीच्या कामासाठी कोणत्याही प्रकारच्या वाहनांसाठी बंद होते. 6 जानेवारी रोजी रात्री दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलेले फाटक आज 9 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वाहनांच्या वाहतुकीस खुले करण्यात आले.
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक ते भिवपुरी रोड रेल्वे स्थानक या दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर फाटक 21 असून मध्य रेल्वे वरील सर्वाधिक वाहनाची गर्दी असलेले फाटक समजले जाते. त्या फाटकातून अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते आणि त्यामुळे फाटकातील रेल्वे मार्गिका मधील दगडी खडी दबली जात असते. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या फाटकातून होणारी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. 6 जानेवारी रोजी रात्री ही फाटक वाहनांच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आणि आज 9 जानेवारी रोजी ही फाटक वाहतुकीस पुन्हा खुला करण्यात आला आहे. या कालावधीत पेव्हर ब्लॉक लावण्यात आले असून, मार्गिकेच्या दोन्ही बाजूला डांबरीकरण करण्यात आले असून दोन्ही मार्गिकेच्या मध्ये खडी टाकून पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. आज सकाळी हे फाटक वाहतुकीस पुन्हा सुरू केले जात असताना विजय हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.







