नवे वर्ष ठरणार लाभाचे; पर्यटन वाढीला मिळतेय प्रोत्साहन

मुरूड तालुक्यात 1 लाख पर्यटक; लाखोंची उलाढाल अपेक्षित

| आगरदांडा | वार्ताहर |

थर्टी फर्स्टसह नवे वर्ष साजरे करण्यासाठी साजरा करण्यासाठी मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. यामुळे नवे वर्ष पर्यटन व्यवसायाला लाभाचे ठरणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजूून गेली आहेत. सुमारे 1 लाख पर्यटकांना दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नववर्षाच्या निमित्ताने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी समुद्रकिनारच्या हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व फार्म हाऊस यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

व्यावसायिक सावरले
गेले दोन वर्षे कोरोनाच्या साथीने पर्यटन व्यवसास ठप्प झाला होता. त्याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना झाला होता. त्यामुळे यंदा पर्यटनाचा हंगाम जोशात गेल्याने पर्यटकांसह व्यावसायिकांनाही कमालीची उभारी आलेली आहे. तीच उभारी आगामी नव्या वर्षातही राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील जंजिरा किल्ला, काशीद, कोर्लई किल्ला, चिकण , बारशीव, सवतखडा, दत्तमंदिर, गारंबी अशा विविध पर्यटनस्थळावर गर्दी केली आहे. पर्यटकांना आकार्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टॉरंटच्या मालकांना विद्युत रोषणाई व डिजे नाईट पार्टी उत्तम सोय करण्यात आली आहे. समुद्रकिनारी असणा-या हॉटेलमध्येही पर्यटकांना विविध मनोरंजनाचे खेळ, ऑर्केस्ट्राची व्यवस्था तसेच कोकणी, गोमांतक, कोळी, आगरी अशा मासांहारी पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध बाईक, घोडे, उंट सवारी यांचा मनमुराद आनंद लुटत यावा यासाठी त्या त्या मालकांना जय्यत तयारी केली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांना समुद्रकिनारी दाखल झाले असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी मुरूड पोलीस निरीक्षक अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विविध चेकपोस्ट वाहनांची तसेच मद्यपान करून वाहन चालविणा-यांची तपासणी केली.

Exit mobile version