पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार

हवामान खात्याचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
मागील महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदा जून महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा पावसाची नोंद कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला होता. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

दरम्यान, या पावसाच्या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 26 जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र कोकणचा काही प्रदेश वगळता राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version