| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील मढाळी बु. येथे दि. 18 पासून एनएसएस शिबिरास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. रा.जि.प. शाळा मढाळी बु. तालुका येथे एनएसएस युनिट ऑफ वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या एनएसएस कॅम्प सुरुवात झाली आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील क्षेत्राचा अनुभव तसेच आदिवासी भागातील लोकांचे राहणीमान तेथील समस्या त्यावर आपल्याकडून सहकार्य काय करता येईल, यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्याकरिता कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉ. निथ्या वर्घसे यांनी या आदिवासी बहुल भागातील हे गाव निवडले असल्याचे सांगण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात परिसरामधील स्वच्छता करून करण्यात आले.
यावेळी एनएसएस युनिट ऑफ वेस्टन कॉलेज अँड बिझनेस मॅनेजमेंट सन्माननीय डॉ.नित्या उपस्थित होते. या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी: सहाय्यक प्राध्यापक बरकाथु निशा.आर आणि प्राध्यापक अभिषेक गुरव यांच्या नियोजनाने या शिवाराची सुरुवात झाली. शिबिराचे मार्गदर्शक तथा आदिवासी भागांमध्ये वाडी वस्तीवर शिबीर राबवण्याचे मार्गदर्शन करणारे ग्रेगरियन इंग्लिश मीडियम किल्ला शाळेचे मॅनेजर फिलिप प्राध्यापक बिबी टीचर बि. जॉर्ज , जॉन्सन साजीन अँड जॉहन या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दि. 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत मढाळी बुद्रुक या गाव व परिसरामध्ये शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.







