कोरोनाचे 1.68 लाख नवे रुग्ण
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतात सद्यस्थितीत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काल दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 13 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून आज त्यामध्ये घट दिसून आली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 68 हजार 63 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर 69 हजार 959 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 277 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनमुळे चिंता व्यक्त केली जात असताना त्याच्याही नव्या रुग्णसंख्येचा वेग सध्या मंदावला आहे. गेल्या दोन दिवसात 500 च्या आसपास ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसभरात सापडत आहेत. काल 4 हजार रुग्णांचा टप्पा पार केल्यानंतर आज एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 4 हजार 461 इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 21 हजार 446 इतकी आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 10.64 टक्के इतका आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. यात पुढच्या काळात रुग्णसंख्या किती वेगाने वाढेल याचा अंदाज नसल्याने रुग्णालयांतील सुविधा अद्ययावत ठेवाव्यात, अशी सूचना केली. दरम्यान, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनीही राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची व वरिष्ठ अधिकार्यांची व्हर्च्युअल बैठक घेतली. राज्यांनी कोणत्या पद्धतीने मायक्रो मॅनेजमेंट कडे लक्ष ठेवावे याच्याही सूचना दिल्या आहेत.