। मुंबई । वार्ताहर ।
सध्या देशात कोरोनाचा विषाणूने हाहाकार माजवलेला आहे. भारतात गेल्या चोवीस तासात 2 लाख 68 हजार 833 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल सापडलेल्या रुग्णसंख्येत 4 हजार 631 जणांची भर पडली आहे. सध्या देशात 14 लाख 17 हजार 820 अॅक्टिव्ह कोरोना केसेस असून पॉझिटिव्हिटी रेट 16.66 टक्क्यांवर गेला आहे.
दिवसेंदिवस दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही वाढत असून ही चिंतेची बाब आहे. काल पॉझिटिव्हीटी रेट हा 14.78 टक्क्यांवर होता आज तो 16.66 वर गेला आहे. येणार्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्क्यांवर होता. तर दुसर्या बाजुला ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
आतापर्यंत देशात 5 हजार 753 जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे. आज यामध्ये आणखी वाढ झाल्याचं चित्र आहे. आज देशात 6 हजार 41 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.