कडाक्याच्या थंडीबरोबर रूग्ण संख्या वाढली

| खांब-रोहा | वार्ताहर |

गेल्या आठ दिवसांपासून वातावरणाचा पारा खाली घसरल्याने थंडीचा कडाकाही वाढू लागला आहे. परिणामी सामान्य रूग्णांची संख्याही वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे.

थंडीचा मोसम आणि सर्दी, खोकळा व ताप यांचा जवळचा संबंध आहे. तर दिवसेंदिवस थंडी वाढू लागल्याने या सामान्य आजाराचे रूग्णही वाढू लागल्याने दवाखान्यातही रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहाटेच्या सुमारास पडणारे किरकोळ धुके व बोचणा-या थंडीचा आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. थंडीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वांनाच थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या त्रासामुळे सर्दी, खोकळा व किरकोळ तापाचे रूग्णही वाढू लागल्याने छोट्या मोठ्या दवाखान्यात रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. तर थंडीच्या दिवसात प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन आपले आरोग्य निकोप कसे राहिल याकडे लक्ष देण्याची सूचना तज्ञ डाँक्टर रूग्णांना देत आहेत.

Exit mobile version