पिरवाडीत पर्यटकांची मंदियाळी

| उरण | प्रतिनिधी |

उरणच्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी मांदियाळी भरली आहे. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली शमविण्यासाठी पर्यटक समुद्रात डुंबण्याचा तसेच लाटांचा आनंद घेत आहेत. उरणमधील पिरवाडी हा तसा छोटासा किनारा आहे. मात्र तरीही या किनारपट्टीवर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

किनार्‍यावर एक दर्गा असून या दर्ग्यावर येणारे भाविक हे मुंबई, ठाणे व नवी मुंबई सह इतर ठिकाणाहून येतात. यातील बहुतेक पर्यटक हे रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे सध्या पिरवाडी किनार्‍यावरील पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Exit mobile version