वृद्ध महिलेस लुटले

। पनवेल । वार्ताहर ।
एक 68 वर्षीय वृद्ध महिला चहाच्या टपरीवर असताना दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरुन येवून त्यातील एकाने खाली उतरुन पाणी पिण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील जवळपास 2 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज खेचून पसार झाल्याची घटना तालुक्यातील मोठे भिंगार परिसरात घडली आहे. विठाबाई पवार (68) यांची चहाची टपरी असून त्या चहाच्या टपरीवर असताना दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवरुन येवून त्यातील एकाने खाली उतरुन पाणी पिण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील जवळपास 2 लाख 7 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version