| पनवेल | वार्ताहर |
एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील दागिने खेचून दोघे जण पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. सुषमा पाटील (65) या मिडलक्लास हौसिंग सोसायटी परिसरात फिरत होत्या. त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन व सोन्याचे मणी वाटी असलेले मंगळसूत्र असा जवळपास 75 हजार रुपये सोन्याचा ऐवज मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी खेचून पोबारा केला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.