| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विजय साजरा करण्यात आला. आरसीबीच्या विजयानंतर जगभरातील चाहत्यांनी या विजयाचा एकच जल्लोष केला आहे.
आयपीएल 2025चे विजेतेपद आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून जिंकले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या. त्यानंतर पंजाब किंग्ज 184 धावा करू शकला. शशांक सिंगने संघासाठी 61 धावांची खेळी खेळली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अंतिम सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावत 190 धावा केल्या. त्यानंतर पंजाब किंग्जने हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला, पण 20 षटकांत 7 गडी गमावत 184 धावांवरच त्यांचा डाव थांबला आणि आरसीबीने 6 धावांनी थरारक विजय मिळवला!
नऊ वर्षांपूर्वी, 2016 मध्ये आरसीबी अंतिम फेरीत पोहोचले होते, पण ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मात्र यंदा त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलं.” विराट कोहलीने आपला अनुभवी खेळ दाखवत संघाला बळ दिलं, आणि विजयानंतर विराटच्या आनंदाचे क्षण सगळ्यांनाच भावले. या विजयानंतर आरसीबी चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष झाला. विराट कोहलीच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. मैदानावर खेळाडू आणि चाहत्यांनी आनंदाच्या उड्या मारल्या. सोशल मीडियावरही जोरदार जल्लोष झाला. ‘‘ई साला कप नामदे’’ हे आता केवळ घोषवाक्य नाही, तर एक सत्य ठरले आहे. बेंगळुरूच्या रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा झाला, फटाके फोडले गेले आणि चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. हा विजय फक्त एक सामना जिंकण्याचा नव्हता, तर आरसीबी आणि त्यांच्या चाहत्यांचा स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण होता. आरसीबीसाठी सामन्यात गोलंदाज आणि फलंदाजांनी जोरदार कामगिरी केली.
आरसीबी संघ दीर्घ प्रतीक्षेनंतर चॅम्पियन बनला
आरसीबीने यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, संघाला यावेळीच विजय मिळाला. हंगामापूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला कर्णधार बनवले. त्याच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने दीर्घ प्रतीक्षेचा अंत केला आणि ट्रॉफी जिंकली. विराट कोहली, जोश हेझलवूड, फिल साॅल्ट, कृणाल पांड्या आणि जितेश शर्मा यांनी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.
आरसीबीचे प्लेइंग इलेव्हन :
फिलिप साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन :
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.