। रेवदंडा । प्रतिनिधी ।
बेलोशी गावातील चित्रकार महेंद्र गांवड यांनी गावाच्या जंगल भागात असलेल्या कोंडीचा धबधबा सभोवतालचे निसर्ग चित्राने वेध घेतला, आणि त्यांच्या कल्पकतेतून चक्क दगडातून वाघ साकारला.
बेलोशी येथून सागवाडी गावापासून तीन किमी अंतरावर असलेला कोंडीचा धबधबा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून पावसाळयात या निसर्ग रम्य परिसरात स्थानिकासह अलिबाग, रोहा, मुंबई आदी शहरातील निसर्गप्रेमी मंडळी भेट देतात. जंगलभागात लहान मोठ्या दगडातून खळखळ वाहणार्या पाणी व सभोवतालचे निसर्गाचे रूप चित्रकार महेंद्र गांवड यांनी मनात कल्पकतेने जागा घेतली.तेथील एका मोठ्या दगडातून चित्रकलेच्या माध्यमातून वाघाचे चित्र रेखाटण्याची कल्पकता डोक्यात शिरली आणी या कल्पकतेतून चित्रकाराने दगडातून वाघ साकारला. या दगडातून साकारलेल्या वाघाची कलाकृती सोशल मिडियाद्वारे गेल्याने सर्वत्र या चित्रकाराचे कौतुक व्यक्त करण्यात आले.