पालीतील शवविच्छेदनगृह हरविले गवतात

संबधित खात्याचे दुर्लक्ष
शवविच्छेदन गृहात जाण्यासाठी रस्ताच नाही

। पाली । वार्ताहर ।

संपूर्ण तालुक्यासाठी पाली शहरात एकमेव शवविच्छेदनगृह आहे. याठिकाणी तालुक्यात घडणार्‍या घटना वा अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जातात परंतु या शवविच्छेदनगृहाच्या सभोवताली गवताचे साम्राज्य पसरले असून शवविच्छेदन गृहात जाण्याचा रस्ता नसल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना गवतातून वाट काढावी लागत आहे. या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
अपघात व इतर घटनांतील मृतदेह पोलीस वा मृतांचे नातेवाईक येथे शवविच्छेदन करण्यासाठी येतात; परंतु पोलीस कर्मचारी व नातेवाइकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या सुमारास अंधारात गवतातून मृतदेहाची ने-आण करणे अतिशय कठीण होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. त्यामुळे शवविच्छेदन गृहाच्या परिसरातील गवत काढून शवविच्छेदन गृहात जाण्यासाठी रस्ता करावा व गृहात स्वच्छता ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version