धक्कादायक! चिमुकलीला ट्रेनच्या शौचालयात टाकून पालक पसार

मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमधील संतापजनक प्रकार

। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।

मुंबई-देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री अंदाजे एक ते दीड महिन्याची चिमुकली शौचालयात टाकून अज्ञात पालक पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या बाळाच्या अज्ञात पालकांविरोधात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर मध्यरात्री बाथरूममधून लहान मुलांचा रडण्याचा आवाज आला. आत पाहिले असता शौचालयात एक-दीड वर्षाची मुलगी कमोडच्या शेजारी ओढणीवर झोपलेली आढळली. त्यानंतर गाडीमध्ये या बाळासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, कोणीही त्याची जबाबदारी घेतली नाही. अखेर प्रवाशांनी कंट्रोल रुमला घटनेची माहिती दिली. त्यानंतर मनमाड रेल्वे स्थानकावर बालकाला उतरविण्यात आले असून त्यास नाशिक येथे बालसुधारगृहात ठेवण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पालकांचा शोध घेत आहेत.

Exit mobile version