लोक अदालतीत 1143 प्रकरणे निकाली

1,20,27,694 वसूल
चौक | वार्ताहर |
खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यात 1143 प्रकरणांचा कायम निकाल करून 1,20,27,694 रुपयांची वसुली करण्यात आली.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वादपूर्व प्रकरणे व गुन्हा कबुलीही अशी एकूण 4299 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1143 प्रकरणे निकालात काढून 1,20,27,694 एवढी वसुली करण्यात आली. पंच म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.डी. बावले, सह. दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने, सहन्यायाधीश एल.के. सपकाळ, सचिव तथा विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी काम पाहिले. वकील वर्गाकडून सिद्धेश जितेकर, स्वाती म्हात्रे, पी.एल. व्ही. अधिकारी संजय सांगलें, मिलिंद पारठे तर सरकारी वकील कल्पना फोंडके, सह अधीक्षक सुभद्रा चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
एकूण वसुलीपैकी ग्रामपंचायत घरपट्टी 73,83,366 व पाणीपट्टी 5,74,540 एवढी वसुली करण्यात ग्रामपंचायत विभाग यशस्वी झाला, तर उर्वरित खोपोली नगरपालिका व खालापूर नगरपंचायत यांची वसुली झाली. वकील मिलिंद सुरावकर, सचिन चाळके, व्ही.टी.म्हात्रे, दांडगे, शहनवाज खान, मयूर कांबळे, योगेश मानकवळे, आरती गुप्ता, सरिता वाघमारे व अन्य वकील तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहून कामकाज सुरळीत पार पाडले.

Exit mobile version