आप्पासाहेबांचे खोटे पत्रक व्हायरल करणाऱ्यास अटक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

थोर निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी करणयाच्या हेतूने सोशल मिडियावर एक खोटे पत्र प्रसिद्ध करणार्‍या शुभम काळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी अलिबाग मधील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी दुपारी न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.

खारघर येथील दुर्घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 17 एप्रिल रोजी सदभावना पत्रक प्रसिध्द करून घटनेबाबत प्रतिक्रिया यक्त केली होती. धर्माधिकारी यांची बदनामी व्हावी, तसेच अनुयायांमध्ये राज्य शासनाबाबत शत्रुत्वाची, द्वेशाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न अज्ञाताने खोडसाळपणा करीत सरकार विरूध्द उठाव होईल अशा उद्देशाने खोटे पत्रक तयार केले. हे पत्रक सोशल मिडीयासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिध्द केले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे सोपावण्यात आला. तपासाची सुत्रे वेगात हलवली. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. पुणे येथून त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची प्राथमिक चौकशी केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला सोमवारी अटक करून दुपारी अलिबागमधील दुसरेसह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मोहिते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

Exit mobile version