नांदगाव स्टेट बँक समोरील खड्डा धोकादायक

। कोर्लई। वार्ताहर।
डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर रस्त्यांची दुरवस्था पाहाता साळाव-मुरुड रस्त्यावरील नांदगाव स्टेट बँक समोरील खड्डा अपघाताला आमंत्रण ठरत असून या रस्त्यांच्या कामांना मुहूर्त कधी होणार ? असा सवाल नागरिक व प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
यंदा ढगफुटी सदृश अतिवृष्टीने, अवकाळी पावसाने साळाव-मुरुड रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे.विहूर,मोरे ते मजगांव, उसरोली फाटा, नांदगाव बाजार ते बाजारपेठ,वाघेश्‍वर नगर,दांडा,सर्वे, काशिद, काशिद यु-टर्न,बारशिव,बोर्ली स्टँड,कोर्लई भागात रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालक यांना त्रास व हाल सहन करावा लागत आहे.यारस्त्यावरील विहूर व चिकणी पूलाची अतिवृष्टीमुळे दुरावस्था झाली होती.या दोन्ही पुलाची कामे अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.याकडे संबंधित लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून साळाव-मुरुड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत व सुस्थितीतील रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी.अशी अपेक्षा नागरिक व प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version