अंगावरून डम्पर गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
। ठाणे । प्रतिनिधी ।
दिवसेंदिवस महामार्गांवरील होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहनचालकांचा भरधाव वेग अशाने अपघात्यांची मालिका सुरूच आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी अखेर एका तरूणाचा जीव घेतला. रांजनोली पूलाजवळ खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जाऊन रस्त्यावर पडलेल्या या तरूणाच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रिजेशकुमार जैस्वार असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी डम्पर चालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.