| पेण | प्रतिनिधी |
पेण-बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्टवरील कुंटणखाना प्रकरणी दि.23 मार्च रोजी चार जणांना अटक करण्यात आली होती. जुल्फिकार जलाल उद्दिन, खगेंद्र कंम्बुमलीक, देवेंद्र पाटील व रविंद्र मलीक अशी त्यांची नावे आहेत. यावेळी तीन पिडीत महिलांची देखील सुटका करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. या दरम्यान चौकशीअंती नवीन चार आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये गणेश अण्णा, सुनिल कुमार मेहता, गणेश सुरेश गायकर आणि एक नाव पोलीसांनी गुपीत ठेवले आहे. तेव्हा पासून पोलीस या चार आरोपींना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे नाक्यानाक्यावर उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. पोलीसांवर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चादेखील जोर धरत आहे. यातील अगादेरचे चार आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. परंतु, नविन चार आरोपी पोलिसांना गेली आठ दिवस गुंगारा देत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीवर सत्ताधारी पक्ष सोडून राजकीय मंडळींकडून संशय व्यक्त केला जात आहे.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606