उरणमधील राजकीय मैदान शांत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असले तरी राजकीय मैदान मात्र अद्यापही शांत आहे. अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस उलटला, तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाकडून मिळाली आहे.

उरण नगरपरिषदेची निवडणूक अनेक वर्षांनी होत असून, सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही एकही अर्ज न आल्याने स्थानिक राजकारणात चक्रावलेपणा निर्माण झाला आहे. तसेच, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि.17 नोव्हेंबरपर्यंत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार गुरुवारी (दि.13) अर्ज दाखल करणार असून, महाविकास आघाडी शुक्रवार (दि.14) मैदानात उतरणार आहे. परंतु, नगराध्यक्षपदाचा चेहरा अद्याप कोणत्याही गटाकडून जाहीर झालेला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच पक्ष आपले मोहरे उघड करतील, अशी चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. दरम्यान, स्थानिक राजकारणातील गुप्त हालचाली, आंतरकलह आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी सध्या वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसांत या थंड रणांगणात कोण पहिली चाल खेळतो, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version