रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यास सुरवात

| पनवेल । वार्ताहर ।

पावसाचा जोर जास्त असल्याने त्यातही पाऊस जास्त लांबल्यामुळे प्रभागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. बर्‍याचवेळा खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने खड्डे परत जैसेथे अशा अवस्थेत होत होते. परंतु नागरिकांना गैरसोय आणि या खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून विक्रांत पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या मागे लागून टप्याटप्याने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करून घेतली आहे. सध्या वीर सावरकर चौक, सारस्वत बँक समोर, श्री गजानन सहकारी गृह संस्था समोर, स्टेटस हॉटेल समोर आणि रिलायन्स फ्रेश समोरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.

Exit mobile version