। मुंबई । वार्ताहर ।
यंदा मान्सूनने वेळेआधीच हजेरी लावली आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणार मान्सून या वर्षी 29 मे रोजीच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने जून महिन्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढील 2 ते 4 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96 टक्के ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.




