। कर्जत । वार्ताहर ।
कांदा पाठोपाठ आता लसणाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले आहे. असे असताना लसणामुळे देखील डोकेदुखी वाढवणार आहे. कारण लसणाचे भाव किरकोळ बाजारात तब्बल 360 ते 400 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी 200 ते 250 रुपये किलो असलेला लसूण आता 360 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऐन दिवाळीत लसूण महागल्याने सर्व सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागत आहे.