| आंबेत । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून वीज आणि पाणी ही मूलभूत घटकांमधील गोष्टींची अद्याप मार्गी न लागल्याने सदर दवाखाना ताटकळत पडला आहे. आंबेत परिसरात खासगी दवाखाने हे अव्वाच्या सव्वा रुपये नागरिकांकडून उकळत असून याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. एकीकडे प्रतिक्षेच्या झोतात असलेला आंबेत मधील दोन आरोग्य केंद्र अद्याप काही सोयींनाभवी ताटकळत असल्याचे चित्र समोर आहे, हीच बाब लक्षात घेत रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी लक्षात घेऊन तालुक्यातील इतर यंत्रणांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी श्री गांगुर्डे यांनी तात्काळ या दवाखान्याला भेट देत सदर प्राथमिक आरोग्य केंद्र करीता जल जीवन मिशन अंतर्गत विशेष तरतूद करण्यात येणार असून, येत्या महिना भरात काम मार्गी लागणार असल्याची ग्वाही त्यांनी आंबेत येथे व्यक्त केली.