गूळसुंदे शाळेतील पाण्याची समस्या सुटली

| रसायनी | वार्ताहर |

स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल गूळसुंदे येथील मुख्याध्यापिका ममता पाटील यांच्या पाठपुराव्याने व अजित पाटील यांच्या सहकार्याने प्रमोद झवेरी फाऊंडेशनकडून बोअरवेलच्या माध्यमातून शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. फाल्गुनी देवांग झवेरी (शुभदा पॉलिमर प्रॉडक्ट) यांच्या सहकार्याने जवळपास चारशे मुलांना याचा लाभ झाला आहे.

या कार्यक्रमासाठी कैलास गावडे, आर.डी.पाटील, सखाराम पाटील, भाई लाड, बबनराव गुडेकर, जिग्नेश दवे, आनंद उपासनी, सचिन पवार, राजेश बावीसकर, सुनील पाटिल, प्रताप पंडित आदि मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version