पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला;कोणाकडे आहे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी

| मुंबई | प्रतिनिधी |
मागच्या चार महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळालेले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे काढून त्यांच्याकडे अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे नाशिक, सातारा आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही.

या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिपदासाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी अजूनही इच्छूक असल्याचे सांगून आशावाद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीने रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. असे असताना भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदासाठीचा दबाव कायम ठेवल्याने नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उदय सामंतांकडेच कायम ठेवण्यात आले आहे.

बुधवारी अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या 7 मंत्र्यांना पालकमंत्रीपदे मिळाली आहेत. यामध्ये पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे, परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल भा. पाटील, वर्धा – सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.

रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे योग्य निर्णय घेतील. रायगड सध्या उदय सामंतांकडे आहे. म्हणजे आमच्याकडेच आहे. त्यामुळे अचडणीची बाब नाहीये. उदय सामंताकडे पहिल्यापासूनच रायगडचे पालकमंत्रीपद आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही; तोपर्यंत पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे राहील. मंत्रिपदासाठी आमची धावपळ सुरुच आहे. योग्य वेळेला निर्णय होईल. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलेले आहे. त्यामुळे ते रायगडचा दावा कशाला करतील? मी मंत्रीच झालो नाही तर पालकमंत्री कसा होणार? मंत्रिपद मिळेपर्यंत पालकमंत्रीपद राखून ठेवलेले आहे. विचारविनिमय सुरु आहे. योग्य तेच घडेल. नवरात्रीमध्ये देवीच्या मनात असेल तर तेच घडेल असं सूचक विधान भरत गोगावले यांनी केलेलं आहे.

Exit mobile version