महामार्गावर गवताचे साम्राज्य; अपघाताची शक्यता

। चौक । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्ग क्र.4 म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत आय.आर.बी. ने न काढल्याने अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही.राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरती दुतर्फा मोठे गवत वाढले आहे.

हा रस्ता चार पदरी असल्याने गावात,हॉटेल किंवा पेट्रोल पंप या ठिकाणी जाण्यासाठी असलेला मार्ग विशेषतः हॉटेल व पंप येथे जाणारा मार्ग बंद केला आहे.या रस्त्यावर असलेल्या नढाळ,वावंढळवाडी,दांडवाडी येथे दुभाजक मध्ये अंतरही नाही,वावंढळवाडी येथे भयानक परिस्थिती आहे.नढाळ येथील दुभाजक जवळ असलेले गवत काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोल्हार यांनी पत्रही दिले आहे.

पनवेलकडून येताना नढाळ गावात शिरताना समोरच वडाचे मोठे झाड आहे,तसेच वाढलेले गवत यामुळे खोपोली कडून पनवेलकडे जाणार्‍या गाड्या दिसत नाहीत,तसेच खोपोली कडे उतार असल्याने पनवेल च्या दिशेकडे पहाताना अवघड होतं आहे.सद्या पडणारा पाऊस व वार्‍याने हे गवत रस्त्यावर पडत आहे.त्याचीही भीती आहेच,या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणारी आय.आर.बी.ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नवीन घाटवळ व स्थानिक जनतेकडून होत आहे.

Exit mobile version