लालबावट्याचा अवमान होऊ देऊ नका- पंडित पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ येथे शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापनदिन सोहळा अभूतपूर्व अशा वातावरणात मंगळवारी साजरा झाला आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात शेकाप कार्यकर्त्यांनी लावलेले लाल बावटे आता सन्मानाने उतरुन ठेवावेत. त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन माजी आम.पंडित पाटील,जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी केले आहे.

अमृतमहोत्सवानिमित्त अलिबाग ते पनवेल मार्गावर साडेसात हजार लालबावटे लावण्यात आले होते.शिवाय प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या घरावर,गावागावात हे लाल बावटे फडकाविण्यात आले होते.त्यामुळे सारा रायगड हा लाल बावटेमय होऊन गेला होता.आता मेळावा संपला आहे.त्यामुळे सर्वत्र लावलेले ध्वज सन्मानाने उतरविण्याची जबाबदारीही आपलीच आहे याचे भान शेकाप कार्यकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे.लाल बावट्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.

तिरंगा फडकवावा
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवही यावर्षी साजरा होत आहे.यानिमित्ताने देशभरात हर घर तिरंगा हे अभियान राबविले जात आहे.या अभियानातही शेकाप कार्यकर्त्यांनी स्वयंस्फर्तीने सहभागी होऊऩ देशाविषयी आपली निष्ठा दाखवून द्यावी,सरकारच्या सुचनेनुसार घरोघरी तिरंगा लावावा,असे आवाहन पंडित पाटील यांनी केले आहे.

मतदार नोंदणी करा
निवडणूक आयोगाने आधारकार्ड आता मतदार कार्डाला जोडण्याचा उपक्रम सुरु केला आहे.त्याबाबतही शेकापतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती केली जावी,मतदारांना त्यासाठी योग्य ती माहिती देऊन हे अभियान यशस्वी करा,असेही पंडित पाटील यांनी सुचित केले आहे.

Exit mobile version