सोलनपाडा पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

तीन कोटींचा निधी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथील जामरंग पाझर तलावाचा दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाली असून तीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्जत विधानसभा मतदारसंघातील पाथरज जिल्हा परिषद वार्डातील जामरुंग पाझर तलावाची दुरुस्ती मुख्यमंत्री जलसंवर्धन प्रकल्प अंतर्गत केली जावी यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रयत्न केले जात होते. जलसंधारण विभागातून सोलनपाडा येथे असलेल्या जामरूंग पाझर तलाव दुरुस्तीच्या कामासाठी 3 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचवेळी याच परिसरातील जामरुंग गावासाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेसाठी 1 कोटी 96 लक्ष निधी मंजूर आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन मनोहर थोरवे आणि ग्रामपंचायत सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जलसंधारण आणि मृदू संधारण विभगाचे कार्यकारी अभियंता कदम, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उप अभियंता सुरेश इंगळे, मृद व जलसंधारण उप अभियंता देशमुख, शाखा अभियंता पाटील, नळवाड आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुका समन्वयक रमेश मते, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे, उप तालुका प्रमुख रामचंद्र मिनीमिने, उप तालुका संघटक दीपक भोईर, संदेश सावंत उपतालुका संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख भगवान घुडे, पंढरीनाथ आगज, भानुदास धुळे, मनोज भोईर, यांच्यासह राजेश भोईर, प्रकाश बंगारी, विनायक पवार, जनार्दन घूडे, योगेश कोकणे, महेश ठाकरे, सुनील भालीवडे, भगवान पिंपरकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version