पायी शिवज्योत आणण्याचा संकल्प

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वादळ शिवज्योत शाहबाज मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांवरून दरवर्षी पायी शिवज्योत आणत असतात. आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील 20 गडकिल्ले व 2024 साली ऐतिहासिक आग्र्याचा लाल किल्ला येथून सुमारे 1300 किलोमीटरचा पायी प्रवास यशस्वी केला. त्यानंतर यंदा तामिळनाडू येथील हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले जिंजी येथून सुमारे 1200 किलोमीटर शिवज्योत पायी प्रवास करून आणण्याचा संकल्प या मंडळाने केलेला आहे. तरुणांच्या या जिद्धीचे व महाराजांवरील भक्ती व प्रेमाचे विशेष कौतुक होत आहे. ही योजना तामिळनाडू, कर्नाटक, बेंगलोर, पुणे मार्गे रायगड-अलिबाग अशी आहे. त्यांनतर अलिबाग तालुक्यातील शहाबाज या गावी जाऊन तिथे या शिवज्योतीची स्थापना करून शुक्रवारी (दि.6) छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन तिथीप्रमाणे शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी दिली.

Exit mobile version