तरुणींचा अभिमानास्पद निर्णय
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगांव शहरातील उतेखोल गावच्या तरुणींनी संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटेल असा निर्णय घेऊन, स्वतः किल्ले रायगडाहून शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत आणली.
सगळीकडेच शिवजयंती निमित्त रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु शिवज्योत आणण्यासाठी दरवेळी गावोगावचे नवतरुण मंडळ जात असून महिलांनी किंवा तरुणींनी मंडळ बनवून आपल्या गावात धावत ज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण तालुक्यातून उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यान दरवर्षी तरुण मंडळी ज्योत आणायला जात असतात परंतु या वर्षी तरुणींनी देखील पुढे येऊन शिवजयंती साजरी करावी व त्यांचा आदर्श हा तालुक्यातील इतर तरुणी व माहिलांनीही घ्यावा हा यामागचा हेतू असल्याचे उतेखोलच्या नगरसेविका ममता थोरे यांनी सांगितले.
यावेळी अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे, दिपाली मढवी, कुमुद जाधव, वैष्णवी जाधव, दिव्या मढवी आदी तरूणी उपस्थित होत्या.