मुरुड अंजुमन इस्लाम हायस्कूलचा निकाल 96.97 टक्के

| आगरदांडा । प्रतिनिधी ।
गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यावर्षीसुद्धा मुरुड अंजुमन इस्लाम हायस्कूलचा 96.97 टक्के निकाल लागला असुन यामध्ये 99 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामधुन 96 विद्यार्थी पास झाले. तर 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले असून 23 विद्यार्थी नापास झाले आहेत. यावर्षी ही अव्वल स्थानी मुलीच राहिलेल्या दिसुन आल्या.
मुरुड अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये शिकत असणारी मदिहा जहुर लसने हीने 93 टक्के गुण मिळुन प्रथम आली. तर द्वितीय अस्मा रिझवान दामाद व आर्विया इर्शाद जमादार या दोघीनिंही 91.60 टक्के गुण मिळुन व्दितीय क्रमांक पटकावला. तहरीम अंसीर चोगले हिने 91.40 टक्के गुण मिळुन तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अंजुमन इस्लाम हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसेन इस्लाईल गोटेकर, चेअरमन अब्दुल रहिम कबले यांनी सत्कार केला.

Exit mobile version