| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातून मान्सूनने अधिकृत माघार घेतली असली, तरीही वातावरण पावसाला पोषक झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगडसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







