कापलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

सावरोली-खारपाडा रस्त्याच्या दुर्तफा गवत कापणी

| पाताळगंगा | वार्ताहर |

सावरोली-खारपाडा या रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यात गवत वाढल्यामुळे गेल्या आठवड्यापासून गवत कापणीस सुरुवात झाल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करत होते. मात्र, कापलेले गवत हे साईडपट्टीवर पडल्यामुळे वाहनचालकांस समोरुन येणार्‍या वाहनांना मार्ग देताना साईडपट्टी दिसत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुर्तफा असलेले गवत कापून निव्वळ प्रवाशांची समजूत घातल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पूर्वी या रस्त्याची बिकट अवस्था असल्यामुळे आता रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ज्या संबंधित खात्याकडे आहे, त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर वळणावरील वाढलेले गवत जसेच्या तसे असल्यामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यत निर्माण झाली आहे.

Exit mobile version