उमरोली गावासमोरील रस्ता खड्डेमुक्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली भागातील रस्त्याच्या दुभाजकाजवळ असलेले खड्डे भरण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या भागातील रस्त्याच्या मध्यभागी असलेले खड्डे बुजविले आहेत.

ग्रुप ग्रामपंचायत उमरोली हद्दीतील कर्जत-कल्याण महामार्गावर उमरोली गावासमोरील रस्त्याच्या दुभाजकामधील खड्डे बुजविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण करण्यात आली होती. या खड्ड्यांमुळे सर्व ग्रामस्थांना आणि इतर वाहनांना खूप त्रास होत होता. त्यामुळे ते खड्डे तात्काळ भरण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उमरोली प्रचिती गायकर आणि मनसे शाखा उमरोली यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाचे कनिष्ठ अभियंता आडे यांनी त्या रस्त्या दुरुस्ती सांभाळणारे ठेकेदार कंपनी यांना त्या भागातील दुभाजकामधील खड्डे भरण्याची सूचना केली आहे. संबंधित रस्त्याचे काम पाहणारे ठेकेदारांना सूचित केल्यानंतर त्या भागातील रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. मनसेच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांचे वाहनचालकांनी आभार मानले आहेत.

Exit mobile version