शेकापमुळे ‘या’ गावातील रस्ते होणार चकाचक

ग्रामपंचायती हद्दीतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील चिंचवली गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिंचवली बौद्धवाडी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम भगत यांच्या हस्ते करण्यात आला. शेकापचे कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष वैभव भगत आणि विभागीय चिटणीस रामदास शेलार यांना हा निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती निलिमा पाटील यांच्या माध्यमातून मिळाला आहे.

चिंचवली गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बौद्धवाडी रस्ता पाच लाख रुपये खर्चून केला जाणार आहे. हा निधी मिळावा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे युवा आघाडीचे प्रमुख वैभव भगत आणि रामदास शेलार यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती निलिमा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून प्राप्त केला.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस राजेश भगत, शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका कार्यकारणी सदस्य शेकाप सुहास भगत, पुरोगामी युवक संघटना उमरोली जिल्हा परिषद उपाध्यक्ष चरणदास भगत, पुरोगामी युवक संघटना चिंचवली अध्यक्ष राजेश नाईक, पुरोगामी युवक संघटना चिंचवली उपाध्यक्ष सुरज भगत, चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच दिपाली कांबरी, माजी उपसरपंच सदस्य ऋषीकेश भगत, चिंचवली ग्रामपंचायत सदस्या ज्योत्स्ना भगत, सदस्या सुप्रिया भगत, सदस्या सुषमा बोराडे, सदस्य रोशन पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version