| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
चव्हाणवाडी, ता.पाली येथील तळे, विहिरी व पाणवठ्यावर जाणारे रस्ते अडवल्याने विकासक व ग्रामस्थांचा वाद शिगेला पोहचला आहे. पाणवठ्याकडे जाणारे रस्ते मोकळे करावेत व अवैधरित्या होत असलेला पाणी उपसा त्वरित थांबवावा या मागणीसह कारवाईसाठी पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जलद कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
फार्महाऊसचे काम करण्यासाठी तलावातील अमर्याद पाण्याचा अवैधरित्या उपसा होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तसेच पाणी पिण्यासाठी जनावरांचा येण्या जाण्याचा रस्ता देखील बंद करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच बाजुला असल्या मुळे स्थानिक लोकांचा सुद्धा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला असुन हे सर्व प्रकरण ग्रामस्थांनी पाली तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना तक्रारी बाबत आवश्यक सूचना केल्या आहेत. संबंधित प्रशासनाचे अधिकारी प्रत्येक्ष घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी करतील व पाहणीनंतर योग्य ती कार्यवाही केली असे तहसीलदार कुंभार यांनी सांगितले.
यावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, मनसे उपतालुका अध्यक्ष केवल चव्हाण, चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष परेश वनगले, समाजसेवक नितीन यादव, रोहित अ. चव्हाण, हिरामण पाटेकर, सुरेश घोगले, संजय यादव, पिठु चव्हाण, पिठु यादव, मुकेश चव्हाण, काशिनाथ वनगले, दिपक पाटेकर, आदींसह ग्रामस्थ , पदाधिकारी उपस्थित होते.