| पनवेल | वार्ताहर |
लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्केवारी वाढविण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. ज्या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त अशा केंद्रांचे संपूर्ण कंट्रोलिंग महिलांच्या हाती देण्यात आले आहे. पनवेलमध्येही एक वुमन्स पोलिंग बूथ तयार करण्यात येणार आहे.
राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. बूध क्रमांक 332 येथे सर्व जबाबदारी महिलाच सांभाळणार आहे. पनवेल तालुक्यात एकूण 544 मतदान केंद्रे असणार आहेत. यापैकी 332 क्रमांकाच्या केंद्राचे नियंत्रण महिलांच्या हाती असणार आहे. केंद्रावर सर्व कर्मचारी महिला पनवेल शहरातील वाजेकर स्कूल केंद्रावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारीसुद्धा महिलाच असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 7 वुमन्स पोलिंग बूथ असणार आहेत.
महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्राची सुरक्षिततादेखील लक्षात घेतली जाणार आहे.
राहुल मुंडके,
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी,
पनवेल
