कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरु
राज्य सरकारकडून निर्णय जारी

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहे.

दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणार्‍या गावातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असं यात नमूद करण्यात आलं आहे. तसेच कोरोनासंबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं, असं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

मार्गदर्शक सूचना

Exit mobile version