दगडी शाळेला नवे रूप

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावात असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा ‘दगडी शाळा’ या नावाने प्रसिद्ध आहे. या शाळेला नव्याने सुशोभित करण्यात येत असून शिक्षण विभागाने या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या भिंती पक्षी, प्राणी आणि फळा-फुलांच्या रंगांनी सजवलेल्या आहेत. नेरळ गावात दगडी बांधकाम केलेली शाळा असून 100 वर्षे जुन्या असलेल्या या शाळेला नाव देखील तेथील दगडी बांधकामामुळे ‘दगडी शाळा’ असेच पडले आहे. या शाळेची इमारत 2017, 2018 मध्ये वाहनतळ बनविण्यासाठी तोडण्यात येणार होती. त्यावेळी तेथे पार्किंग करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा डाव उधळवून लावला गेला होता. एक दुमजली आणि एक शंभर वर्षे जुनी अशा दोन इमारती असलेल्या शाळेत जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची शाळा भरवली जात आहे. या इमारतीचे नूतनीकरण करून अद्ययावत अशा वर्गखोल्या तयार झाल्या आहेत. शाळेच्या परिसरात एक अंगणवाडी देखील भरवली जात आहे.
मात्र, नवीन कामांमुळे दगडी शाळा नव्या स्वरूपात सजली जात आहे. शाळेच्या भिंतींवर आकर्षक अशी रंगसंगती करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version