ऑस्करमध्ये ‘ड्यून’ची मोहर

। लॉस एंजेलिस । वृत्तसंस्था ।
जागतिक स्तरावर सर्वोच्च मानला जाणारा 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज पहाटे लॉस एंजेलिस मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा मान कोडा (लेवर) या चित्रपटाला मिळाला असला तरी सर्वाधिक पुरस्कारांचा मानकरी मात्र ड्यून हा चित्रपट ठरला आहे.
सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणार्‍या यंदाच्या 94 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. करोना काळानंतर 2 वर्षांनी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ङ्गडयूनफ चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहेत. मड्यूनफ ला 10 नामांकने होती तर मद पॉवर ऑफ द डॉगफ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजेच 12 नामांकने होती. कोडा देखील तितकाच दर्जेदार चित्रपट या स्पर्धेत होता. पण सर्वाधिक पुरस्कार मात्र मड्यूनफच्या पदरी आले.
वॉर्नर ब्रदर्स निर्मिती मड्यूनफ या चित्रपटाचे दिग्दर्शन डेनिस विलेन्यूवे (ऊशपळी तळश्रश्रशपर्र्शीींश) या प्रसिद्ध दिग्दर्शकाने केले आहे. या चित्रपटात टिमोथी चालमत आणि जेसिका फर्ग्यूसन यांच्या मुख्य भूमिका आहेत. सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर, सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन, सर्वोत्कृष्ट साउंड, सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे सहा पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.

Exit mobile version