सर्पमित्रांनी पकडला बारा फुटांचा अजगर

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरातील एसटी डेपोजवळील नितीन आबुर्लेा यांच्या कंपाऊंडमध्ये कामगार करत असताना नरेंद्र माने यांना अजगराचे दर्शन घडले. त्यांनी तात्कळ शहरातील सर्पमित्र संदीप घरत यांना बोलविले. अखेर सर्पमित्र, कंपाऊंडमधील कामगार व वनविभाग यांनी शर्थीचे प्रयत्न करत 12 फूट लांबीचा आणि 20 ते 25 किलो वजनाच्या सुस्त अजगराला पकडले.
या अजगराला पोत्यामध्ये जेरबंद करून येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी या अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र संदीप घरत, वनपरिक्षेत्रपाल प्रशांत पाटील, वनपाल किरण जाधव, रोहित विरुकुड, उमेश चौलकर, कल्पेश वाघमारे, अमित वाघमारे, सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version