| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, लोकसभेचे कामकाज केवळ एक मिनिट चालले. सभापती ओम बिरला यांनी वंदे मातरम गाण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.13) एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमधील संघर्ष सुरूच होता. दरम्यान, संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूंचे खासदार एकमेकांशी भिडले, त्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली. सुरक्षा रक्षक ढालीप्रमाणे मध्ये उभे होते. दिल्लीतील लाठीचार्जवर अमित शाह यांच्या निवेदनाची आणि राम मंदिराच्या देणग्यांच्या चोरीवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर सर्व खासदार लोकसभेत परतले. दरम्यान, राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानीत त्यांच्या कार्यक्रमानंतर झालेल्या शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात एमएमडीआर दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी कामकाजाची सुरुवात गदारोळात झाली; मात्र, वंदे मातरमच्या घोषणेने काही काळासाठी शांतता प्रस्थापित झाली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचेही गुरूवारी लोकसभेत आगमन झाले. तथापि, त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
अधिवेश एका मिनिटांत संपलं
