। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
बुधवारी दुपारी 3 वाजता महिला मेडिकल वॉर्डमध्ये स्लॅब सिलिंगवर पडून पूर्ण सिलिंग महिला वॉर्डमध्ये कोसळले. दोन गरीब रुग्णांना यामध्ये किरकोळ दुखापत झाली. आज प्रत्येक महिन्याला सिव्हिल हॉस्पिटलचा स्लॅब कोसळत आहे; पण याची दखल कोणीही सिव्हिल हॉस्पिटल अधिकारी व प्रशासन घेत नाही. सरकारी निधी फक्त काँट्रॅक्टरांचे फक्त खिसे भरण्यासाठी आहे का ? आज प्रत्येक महिन्याला स्लॅब पडतोय पण अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडत नाही का ? भविष्यात जर स्लॅब पडून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? सरकारकडून आलेला कोट्यावधी निधीचा उपयोग कुठे केला जातो याचा तपास लवकरात लवकर करणार आहेत. रायगड जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णांच्या जीवाशी चालणारा खेळ हा लवकरात लवकर थांबवा, नाहीतर भविष्यात कोणत्यातरी गरीब रुग्णाचा मृत्यू होऊन त्या गरीब घराचा आधार हा तुमच्या अश्या निष्काळजीपणामुळे जाईल.
त्यामुळे तुम्हांला जर असं वाटलं की स्लॅब पडत आहे तर तिथून बाजूला जा आणि दुसऱ्यालाही सावध करा.